आयडियल इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे ला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या “स्वच्छ शाळा,सुंदर शाळा” च्या सर्वेक्षणात मिळाला बहुमान.

तसेच जिल्ह्यातील इतर सात शाळांना “स्वच्छ शाळा,सुंदर शाळा” पुरस्काराचा मिळाला सन्मान.

कणकवली/मयुर ठाकूर.

प्रत्येक माणसामध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करणे तसेच मानवतेची सेवा प्रदान करणे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही संस्था स्थापन करण्यात आली.या संस्थेमध्ये विविध क्षेत्रातील समाजसेवक कार्यरत आहेत.सुमारे 78 देशांमध्ये ही संस्था कार्यरत असून आदर्श महाराष्ट्र भूषण माननीय श्री सुयोग धस,तसेच ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री-पद्मभूषण लोकपाल जनक माननीय अण्णा हजारे,आदर्श गावचे निर्माते पोपटराव पवार,त्याचप्रमाणे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनात ही संस्था कार्य करीत आहे.या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड जीनियस रेकॉर्ड,मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड,वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्यात आलेली आहे.

 या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात "स्वच्छ शाळा,सुंदर शाळा सर्वेक्षण" अभियान राबविण्यात आले होते.यामध्ये आयडियल इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे कणकवली,श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे, माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा,माध्यमिक विद्यालय सोनावल तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा घावनळे भुईवाडा नंबर तीन, जिल्हा परिषद शाळा नेरुळ शिरसोस, जिल्हा परिषद शाळा चेंदवण पाडोशी. या शाळांना "स्वच्छ शाळा,सुंदर शाळा" चा बहुमान प्राप्त झाला आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील बऱ्याच शाळांचा समावेश होता. त्यामध्ये वरील शाळा या प्राधान्याने "स्वच्छ शाळा,सुंदर शाळा" पुरस्कारासाठी सन्मानपूर्वक ठरल्या. वरील प्रशालेंची माहिती श्री.प्रदीप सावंत,श्री.प्रदीप देसाई,श्री. पंढरी जाधव,श्री.मयूर ठाकूर,सौ.स्नेहल गवस,श्री.राजाराम फर्जत तसेच सौ. मधुरा मिलिंद बांदिवडेकर,श्री.भालचंद्र आजगावकर यांनी संस्था पदाधिकाऱ्यांकडे पुरवली होती.

“स्वच्छ शाळा,सुंदर शाळा” या सर्वेक्षणासाठी संस्थेचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री.बापू परब यांनी स्वतः परीक्षण केले आणि सर्वेक्षणात बहुमान प्राप्त झालेल्या शाळांच्या प्रमुखांचे व शिक्षकवर्ग,विद्यार्थी-पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहॆ.

“स्वच्छ शाळा,सुंदर शाळा” हा पुरस्कार 15 ऑगस्ट रोजी देऊन सर्व शाळांना गौरविण्यात येणार आहे.

error: Content is protected !!