कणकवली तालुक्यात पुन्हा अवैध धंद्यांचा सुळसुळाट

गोवा बनावटीच्या दारूचा सप्लाय जोरात

कणकवली पोलीस लक्ष केव्हा देणार?

कणकवली तालुक्यामध्ये यापूर्वी अवैध धंद्यांच्या विरोधात कणकवली पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केल्यानंतर गेले काही महिने बंद असलेले अवैध धंदे पुन्हा एकदा हात पाय पसरू लागले आहेत. मटका, गुटखा, या सहित प्रामुख्याने गोवा बनावटीच्या दारूची पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असताना सुद्धा कणकवली पोलिसांकडून याकडे डोळेझाक केली जात आहे. याबाबत पोलिसांकडून कारवाईची भूमिका घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान गोव्याहून सिंधुदुर्ग पर्यंत ही दारू पोहोचणे हे देखील न उलगडणारे कोडे आहे. अशा स्थितीत कणकवली पोलिस या अवैध गोवा बनावटी च्या दारूवर कारवाई करण्याकरिता वाट कुणाची पाहत आहेत. असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

error: Content is protected !!