पाट हायस्कूलमध्ये वारली चित्रण आणि संस्कृती कार्यशाळा

सुप्रसिद्ध अशा वारली चित्रकलेविषयी पाट हायस्कुल मध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वारली चित्रण करता करता ठाणे जिल्हा येथील आदिवासी पाड्यावर ही संस्कृती कशी विकसीत झाली, त्याचे नृत्य प्रकार, रहाणीमान, निसर्गाशी त्यांची जवळीक, वनौषधी खजीना, वारली घरे, त्यांची गाजलेली वारली चित्रण या विषयी या वर्षीच्या दिवाळीत माहिती देण्यात आली.
दिवाळी हा आनंदाचा सण. हा सण म्हणजे नुसते खरेदी करणे, गोडधोड खाणे एवढा मर्यादित न रहाता या सुट्टीत नवनवीन शिकण्याची वृत्ती मुलांनी जोपासावी. त्याची चौकस बुद्धी विकसीत व्हावी या उद्शाने ही कार्यशाळा आयोजीत केली होती. यामध्ये पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थानी सहभाग घेतला.
यावेळी वारली चित्रणातून शुभेच्छाकार्ड पण बनविण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक ऋता सिद्धेश मार्गी, द्वितीय क्रमांक कामीनी देवदास कुंभार, तृतीय क्रमांक उत्कर्षा प्रविण केरकर, उत्तजनार्थ वैष्णवी सागर चव्हाण, हर्षित अनिल ताम्हाणेकर, ध्रृव रामचंद्र भगत अशी बक्षीसेही मिळविली. कला शिक्षक संदीप साळसकर यानी या कर्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच एस के पाटील संस्थेतर्फे या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. मुखाध्यापक राजन हंजनकर आणि पर्यवेक्षक सयाजी बोदर यांनी यशस्वी मुलांचे अभिनंदन केले. यावेळी दिपीका सामंत, यज्ञा गोसावी, जान्हवी पडते, सिद्धी चव्हाण, स्वप्नाली गोसावी यांचे सहकार्य लाभले.





