शिवसेनेचे माजी विभागप्रमुख अरविंद राणे यांचे निधन

आज दुपारी साकेडी येथे होणार अंत्यसंस्कार

शिवसेनेचे जानवली विभागाचे माजी विभाग प्रमुख, साकेडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य तसेच साकेडी येथील लिंगेश्वर उत्कर्ष मंडळाचे संस्थापक अरविंद श्रीधर राणे (48) यांचे आज बुधवारी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. गेली अनेक वर्ष ते साकेडी ग्रामपंचायतच्या सदस्य पदी कार्यरत होते. लिंगेश्वर उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यातही ते नेहमीच सक्रिय असत. गावातील सामाजिक, राजकीय, धार्मिक सर्वच उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ केंद्रप्रमुख लक्ष्मण राणे, भावजय प्राथमिक शिक्षिका लतिका राणे, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे. कणकवली तील डॉक्टर चंद्रकांत राणे यांचे ते चुलत बंधू होत. त्यांच्यावर आज दुपारी साकेडी येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!