करियर कट्टाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे कुडाळ मध्ये उदघाटन

राज्यातून सुमारे १५० प्राचार्य आणि समन्वयक उपस्थित

उद्या २६ ऑक्टोबरला होणार सांगता

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र महिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करियर कट्टा उपक्रम अंतर्गत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व महाविद्यालयाची भूमीका’ या विषयी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला आज कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात सुरुवात झाली. या कार्यशाळेत राज्यभरातून विविध विद्यापीठातील आणि जिल्ह्यातील सुमारे १५० प्राचार्य आणि जिल्हा समन्वयक उपस्थित आहेत.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महाविद्यलयात करियर कट्टा हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उदघाटन कराची महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अरविंद शिरसाट आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वडाच्या रोपट्याला जल अर्पण करून करण्यात आले. कार्यशाळेची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करियर कट्टाचे विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. अतुल साळुंखे, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा करियर कट्टाच्या प्राचार्य प्रवर्तक डॉ. स्मिता सुरवसे, राज्यस्तरीय गर्जे ग्लोबल समितीचे प्रमुख डी. जी. फोंडेकर, करियर कट्टाचे सहविभागीय समन्वयक प्रा. डॉ. बबन सिनगारे, करियर कट्टाचे तालुका समन्वयक प्रा. अजित कानशिडे आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना करियर कट्टाचे विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. अतुल साळुंखे यांनी महाविद्यालयाना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. विषेशतः ग्रामीण भागात घड्याळी तासिका तत्वावर काम करण्यासाठी प्राध्यापक मिळत नाहीत. त्याबाबत संस्था चालकांनी पुढाकार घेऊन शासनाला याबाबत पत्र लिहून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे उदघाटक अरविंद शिरसाट यांनी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा इतिहास सांगून या करियर कट्टा राज्यस्तरीय कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
कुडाळ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी कुडाळ कॉलेजची देदीपयमान वाटचाल उपस्थितांसमोर मांडली. सर्वांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रासांचालन करियर कट्टाचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. अजित दिघे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अजित कानशिडे यांनी केले. या कार्यशाळेला राज्यभरातून विविध विद्यापीठातील आणि जिल्ह्यातील सुमारे १५० प्राचार्य आणि जिल्हा समन्वयक उपस्थित आहेत. उद्या २६ ऑक्टोबरला या कार्यशाळेची सांगता होणार आहे.

पहिल्या दिवशी विविध विषयांवर चर्चा

या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी संवाद उपक्रमाचा आढावा मांडणे, करिअर संसदेचा आढावा तसेच दिनांक २५ ते ३० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या दिल्ली दौऱ्याबाबत चर्चा करणे, करिअर संसदेतील पदाधिकाऱ्याऱ्यांचे विभागीय अधिवेशन, राज्यस्तरीय अधिवेशनाची तयारी करणे, ‘Al Teacher’ या विषयावरील FDP चे नियोजन करणे, स्टेट रिसोर्स सेंटर नियोजन पहिल्या टप्प्यातील ५ स्टेट रिसोर्स सेंटर महाविद्यालयांचे सादरीकरण, सेंटर ऑफ एक्सलन्स निवड प्रक्रिया व विद्यार्थी नोंदणी आढावा, विद्यापीठनिहाय करिअर कट्टा वाढीसाठीचा कृती आराखडा तयार करणे, कौशल्य विकास विभाग आणि CSR यांच्या मदतीने कौशल्य विकास उपक्रम राबवणेबाबत चर्चा करणे कौशल्य विकास विभाग आणि CSR यांच्या मदतीने कौशल्य विकास उपक्रम राबवणे याबाबत चर्चा होणार आहे

दि. २६ ऑक्टोबरला मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप

या राजस्यस्तरीय कार्यशाळेचा समारोप रविवारी २६ ऑक्टोबरला होणार हाये. यावेळी पालकमंत्री तथा मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह इंजिनिअरिंग आणि व्हॅल्यू मॅनेजमेंट सल्लागारचे चेअरमन राजन नगरे, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लिमिटेड, पुणेचे उपमहाव्यवस्थापक रवींद्र पडवळ, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, राज्याच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!