प्रवीण गवस यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

अहमदनगरला कार्यक्रम; भास्करराव पेरे पाटील आणि पंजाबराब डख यांच्या हस्ते पुरस्कार

दोडामार्ग,ता.1-:
स्वराज्य सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व तेरवण मेढे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रवीण गवस यांना राष्ट्रीय पुरस्कार विजेते तथा आदर्श पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कररावं पेरे पाटील आणि हवामान अभ्यासक पंजाबराब डख यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने सावेडी (अहमदनगर) येथील माऊली सभागृहात कार्यक्रम झाला .
यावेळी सेवा संघाचे संस्थापक यादावरावं पावसे – पाटील, अध्यक्ष बाबासाहेब पावसे- पाटील,डॉ. सुधा कंकरिया,ऍड.प्रवीण कडाळे पाटील,नामदेव शेलार,साहेबराव घाडगे पाटील,दिलीप पाटील, माणिकराव कदम,अमोल पाटील,प्रदीप माने,किरण चव्हाण, शशिकला पवार,नंदकिशोर पुंड,प्रवीण जेठेवाड,अजय पाटील सावंत,डॉ.तेजस नरवाड आदी उपस्थित होते.

पुरस्कार मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा: गवस

प्रभारी सरपंच पदाच्या आणि सरपंच सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदाच्या काळात मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना आपल्याला मिळालेला पुरस्कार आपण अर्पण करतो, असे सांगून श्री. गवस सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

error: Content is protected !!