उत्कृष्ट महसूल कर्मचारी म्हणून अरुण जोगळे यांचा गौरव

कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत श्री. जोगळे

जिल्हाधिकाऱ्यां सह मान्यवरांच्या हस्ते झाला सन्मान

महसूल विभागामध्ये विविध पदांवर काम करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल दिनी 1 ऑगस्ट रोजी उत्कृष्ट कर्मचारी हा पुरस्कार देत गौरव केला जातो. तसाच गौरव कणकवली प्रांताधिकारी कार्यालयातील चालक पदावर कार्यरत असणारे अरुण जोगळे यांचा करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी,
करिष्मा नायर परिविक्षाधीन जिल्हाधिकारी,
विशाल खत्री परिविक्षाधीन जिल्हाधिकारी, मछिंद्र सुकटे निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या गौरवाबद्दल अरुण जोगळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग

error: Content is protected !!