कणकवली महाविद्यालयात पदव्युत्तर विभागाचे प्रवेश सुरू

कणकवली/मयुर ठाकूर
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात पदव्युत्तर विभागातील एम. ए. आणि एम.कॉम.वर्गाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू झाले आहेत.
एम. ए.मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर प्रवेश घेण्याची सोय असून अकाउंटन्सी या विषयातून एम.कॉम.करिता प्रवेश घेता येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे या उद्देशाने कणकवली महाविद्यालयात १९९२ पासून पदव्युत्तर केंद्राची स्थापना करण्यात आली असून जिल्ह्यातील कला व वाणिज्य क्षेत्रातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी एम. ए. व एम. कॉम. साठी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा.
मुंबई विद्यापीठाची प्रवेशाची लिंक सुरू झाली असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे.
तरी होतकरू कला व वाणिज्य क्षेत्रातील पदवीधारकांनी एम. ए., एम. कॉम. साठी प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले आहे.