बौद्धजन पंचायत समिती गट क्र ३६ अंतर्गत शाखा समन्वय समिती व बौद्धचार्य संघ ,नालासोपारा(पू) यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी,12वी ,पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

बौद्धजन पंचायत समिती गट क्र ३६ अंतर्गत शाखा समन्वय समिती व बौद्धचार्य संघ ,नालासोपारा(पू) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १० वी,१२वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा तसेच सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ दि. १६/७/२०२३रोजी रविवारी सायं.५ वा.दुबे हॉल नालासोपारा(पू) येथे पार पाडण्यात आला.सादर कार्यक्रम बौध्दजन पंचायत समिती गट क्र. ३६ चे गट प्रतिनिधी आयु. अजित भाऊ खांबे यांच्या उपस्थितीत आणि समन्वय समितीचे अध्यक्ष आयु किशोर खैरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रतिष्ठित पाहुणे मा.नगरसेविका, मा.शिक्षण समिती सभापती व तांबे एज्यू.ट्रस्ट च्या सचिव वर्षा तांबे, तांबे एज्यू.ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विनय तांबे, बौद्धचार्य संघाचे अध्यक्ष काशिराम कांबळे,कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. महादेव दि. इरकर साहेब यांच्या उपस्थित यशस्वीरीत्या पार पडला .सादर कार्यक्रमास बौध्दजन पं. समिती गट कर ३६ मध्ये येणाऱ्या शाखा क्र ४९२,५६९,५८९,६३८,६९५,७०१,७१४,७२२,७२४,७३२,७३८,
७५०,७७९,८०७,८१७,८२१ या शाखा मधील मुले पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .हा कार्यक्रम चांगला यशस्वी व्हावा म्हणून समन्वय समितीचे सरचिटणीस कमलाकर जाधव व खजिनदार मंगेश मर्चंडे यांनी खूप परिश्रम घेतले.तसेच बौध्दचार्य संघ व समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनीही खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. डॉ.महादेव इरकर साहेबांनी एक तास मुलांना व पालकांना आपल्या मधुर वाणीने,मार्गदर्शनाने मंत्रमुग्ध करून टाकले.तर मा.शिक्षण समिती सभापती वर्षा तांबे यांनी मुलांना व पालकांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.गटप्रतीनिधी अजितभाऊ
खांबे यांनी सुद्धा मुलांना व पालकांना चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अस मार्गदर्शन केलं.हा कार्यक्रम धम्मबांधवानी दिलेल्या धम्म दानातून करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स.समितीचे सरचिटणीस कमलाकर जाधव यांनी उत्तम प्रकारे केले.शेवटी किशोर खैरे साहेब यांनी अध्यक्षीय भाषण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.समन्वय समितीचे प्रमुख संघटक अशोक कांबळे शेरपेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कार्यक्रमाची माहिती दिली.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण