अनावकर सर म्हणजे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातला दीपस्तंभ

पणदूर विद्यालयात शशिकांत अनावकर यांना श्रद्धांजली
एका मंदिरामध्ये सुरू झालेल्या ज्ञानमंदिराचा आज पण दूर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर प्रशालेच्या रूपाने प्रचंड महाकाय वटवृक्षात रूपांतर झालेले आहे शशिकांत आढावकर हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ होत अशा शब्दात शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर याप्रशालेत श्रद्धांजली सभा आयोजित करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी दादासाहेब शिरोडकर शैक्षणिक अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर पुष्कराज कोले सचिव डॉक्टर अरुण गोडकर वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर सचिव आप्पासाहेब गावडे सहसचिव नागेंद्र परब संचालक आनंद भोगले संचालिका सौरिणा सावंत महेश पाटील हरिश्चंद्र कदम माजी मुख्याध्यापक सुधाकर वळंजु तिरोडकर अकादमीचे सुवि काका अनावकर शिक्षक अविनाश वालावलकर तसेच संचालक महेश पाटील संजय गावकर सदा अनावकर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शशिकांत अनावकर यांच्या निधनाने एका ज्ञानयज्ञाचे छत्र हरपले आहे केजी ते पीजी असे शशिकांत अनावकर यांचे स्वप्न होते गोरगरीब मुलांसाठी ज्ञान यज्ञ उभारणाऱ्या या शिक्षणा महर्षी आम्ही विनम्र अभिवादन करतो असे पुष्कराज कोल्हे म्हणाले.
नागेंद्र परब म्हणाले की अनावकर सर ही केवळ व्यक्ती नसून ती एक संस्था होती.
आप्पासाहेब गावडे यांनी मंदिरात सुरू झालेल्या या ज्ञानयज्ञान आज जिल्ह्यात मानाचे स्थान शिक्षण क्षेत्रात कमावले आहे हे सारे कष्ट शशिकांत अनावकर सर यांचे होते असे नमूद करत अनावकर सरांचा जीवनपट त्यांनी थोडक्यात मांडला
डॉक्टर अरुण गोडकर सुधाकर वळंजु मुख्याध्यापक एमजी करपे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत शशिकांत अनावकर यांना आदरांजली वाहिली
पणदूर प्रतिनिधी