शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यामंदिर कणकवलीचे सुयश

सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या खालील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी) मनस्वी पिळणकर -२४२ ( जिल्ह्यात ९वी ), राजवर्धन कापसे- २१८ ( जिल्ह्यात २६ वा ), मैत्रयी हिर्लेकर -२०४ (जिल्ह्यात ५१वी )
पूर्व उच्च प्राथमिक इंग्रजी विभाग (इयत्ता ५वी )स्वराली दीपक साळवे- ७०.६६%, तेजस सत्यवान सावंत -६९.३३%
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८वी) ध्रुव आनंद तेंडुलकर- २५६ (जिल्ह्यात दुसरा), कोमल रामचंद्र भानूसे -२३२ ( जिल्ह्यात ७वी ) ,अथर्व परशुराम कोचरेकर -२२६ (जिल्ह्यात ९वा ) , आदित्य अमोल खानोलकर -२२४ (जिल्ह्यात १०वा), सात्विक विठ्ठल मालंडकर -२१२ (जिल्ह्यात १७वा), आदित्य अच्युतराव वनवे -२०६ ( जिल्ह्यात २२वा) विधी विरेंद्र चिंदरकर -२०४ ( जिल्ह्यात २५वी), वेदांग मंदार दळवी -१९८ ( जिल्ह्यात ३४वा) ,देवश्री गुरुनाथ वालावलकर -१९८ (जिल्ह्यात ३५वी) शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू , ट्रस्टी अनिलपंत डेगवेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका व्ही.बी. जाधव यांच्या हस्ते वरील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सी.ए. अमोल खानोलकर, पत्रकार विरेंद्र चिंदरकर, बीआरसी चे श्री कापसे व इतर पालकांचाही गुलाब पुष्प देऊन आदर सत्कार करण्यात आला. वरील यशस्वी विद्यार्थ्यांना विद्या शिरसाट, सुनिता वारघडे संदीप नागभीडकर, वैभवी हरमलकर, जनार्दन शेळके, नेहा सावंत, संगीता साटम आणि नेताजी जाधव या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सदर सत्कार समारंभाला बहुसंख्य पालक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन अच्युतराव वनवे यांनी केले

error: Content is protected !!