जि.प.शाळा क्र.२ मध्ये सेवानिवृत्ती शिक्षक नको याकरिता गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन

कणकवली/मयुर ठाकूर

      कणकवली मधील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ सेवानिवृत्त शिक्षक नको नियमित शिक्षक पाठवा अशी मागणी विद्यार्थी पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीतर्फे गटशिक्षणाधिकारी मा.गवस साहेब यांच्याकडे करण्यात आली, चांगली पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नका नियमित शिक्षक देऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा असे निवेदन आज देण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षकांना दिले जाणारे रुपये मानधन वीस हजार रुपये च्या लालसेपोटी येणारी शिक्षक न नेमता नवीन होतकरू बेरोजगारांना संधी देऊन तरुण शिक्षकांना प्रोत्साहित करावे तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय शासनाने घ्यावा अशा प्रकारची मागणी पालकांमधून होत आहे. यावेळी शाळा क्र.२ चे व्यवस्थापन समिती सदस्य व विद्यार्थी पालक उपस्थित होते.
error: Content is protected !!