बसस्थानक समस्या विषयी शालेय शिक्षण मंत्री केसरकरांच्या विरोधात पुकारलेले आंदोलन स्थगित
८ लाखाच्या कामाला मंजूरी; मनसे, राष्ट्रवादीसह आंदोलनाला पाठिंबा देणार्यांचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व जेष्ठ सामजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर यांनी मानले आभार
सावंतवाडी
सावंतवाडी बसस्थानकात असलेल्या गैरसोई दुर करण्यासाठी ८ लाखाच्या कामाला मंजूरी देण्यात आली आहे. लवकरच हे काम सुरू होणार आहे. त्यामुळे १८ तारखेला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात पुकारलेले आंदोलन आम्ही स्थगित करीत आहोत, अशी भूमिका आज येथे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अण्णा केसरकर व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडली. यावेळी त्यांनी हे आंदोलन मागे घेतले याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी केली व प्रवाशी वर्ग यांचे होणारे हाल दुर करावे असे त्यांनी सांगितले.