शिवसेना पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

संघटना बांधणी आणि विकासकामांवर करणार चर्चा
दोडामार्ग -: शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुक्यातील पदाधिकारी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले आहेत.मातोश्रीवर ते उद्धव ठाकरे यांना भेटतील.यावेळी तालुक्यातील विकासकामे आणि पक्ष संघटना वाढीसंदर्भात चर्चा करणार आहेत.
तालुकाप्रमुख संजय गवस,उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी,युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे,महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस,उपाजिल्हाप्रमुख विनिता घाडी,मिलिंद नाईक,श्याम खडपकर,संदेश राणे,संदेश वरक आदी मातोश्रीवर गेले आहेत.





