ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये भाजीपाला लागवडीचा अनोखा उपक्रम

कणकवली/मयुर ठाकूर


शेती हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा माणला जातो ,त्यामुळे येणाऱ्या पिढीला शेतीचे महत्व समजण्याची खूप गरज याच अनुषंगाने ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेच्या विज्ञान विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी भाजीपाला लागवडीचा एक आगळा वेगळा उपक्रम राबविला या उपक्रमामध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी पर्यंतचे रेड हाऊस, ब्लू हाऊस, यलो हाऊस, ग्रीन हाऊस चे विद्यार्थी सहभागी झाले होते.लागवड केलेल्या भाजीपाल्याची देखभाल व निगरानी ही मुले दर शुक्रवारी करणार आहेत.
मुलांना बागकामाची आवड निर्माण व्हावी व अशा शालेय स्तरावरच्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्याचा हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या उपक्रमाच्या निमित्ताने ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल आयडियल स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई, विज्ञान विभागाच्या शिक्षिका सौ.शीतल बांदल,सौ.सायली पाताडे, मृणाली सावंत मॅडम,तसेच इ.५ वी ते इ.७ वी चे सर्व वर्गशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते

error: Content is protected !!