तुटलेल्या विद्युत वाहिनीची शॅाक लागून बैल जागीच ठार : मळगाव येथील घटना

सुदैवाने शेतकरी बचावला

सावंतवाडी प्रतिनिधि

     शेतात गुरांना चारायला नेलेले असताना तुटलेल्या विद्युत भारीत वाहिनीचा शॅाक लागून बैल जागीच ठार झाला. मळगाव कुंभारवाडी येथे गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली बैल तडफडत असलेला पाहून त्याच्या दिशेने धावत जाणारा शेतकरी तुटलेली विद्युत वाहिनी पाहून बाजूला झाला अन्यथा अनर्थ घडला असता न्हानू दशरथ खडपकर रा . कुंभारवाडी असे या शेतकऱ्याचे नाव असून पण शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने शेतकरी हतबल झाला आहे . महावितरणच्या गलथान कारभारामुळे हा प्रसंग ओढवला असून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे 
  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे शाखा अभियंता अनिकेत लोहार वायरमन प्रितेश हळदणकर संतोष गावंकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली . तत्पूर्वी या घटनेची माहिती श्री पंचम खेमराजचे निवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर यांनी महावितरणला दिल्यानंतर तात्काळ या ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला . याबाबत पशुधन अधिकारी कृषी अधिकारी व तलाठी यांना कळविण्यात आले असून पंचनामा करण्यात येणार आहे. 
    त्यानंतर महावितरणचे ओरोस सिंधुदुर्ग येथील विद्युत निरीक्षक घटनास्थळाची पाहणी करणार असून बैलाच्या मालकाला नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल अशी माहिती लोहकरे यांनी दिली. दरम्यान महावितरणला या भागातील विद्युत वाहिन्या कमजोर झाल्या असल्याची माहिती आपण वेळोवेळी दिली होती त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा प्रकार घडला नशिबाने शेतकरी वाचला अन्यथा मोठा प्रसंग उडवला असता अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी गणपत शिरोडकर यांनी व्यक्त केली.
error: Content is protected !!