नानिवडेकर काव्य पुरस्कार सोहळा सिंधू वैभव च्या वतीने 11 जुलैला होणार

कोकण नाऊ वरून होणार प्रसारित

सिंधुवैभव साहित्य समूहाचा द्वितीय कै. मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार

एजाज शेख, पुसदा, अमरावती ( स्वच्छ हृदयाचे झरे ) मिताली तांबे, घाटकोपर, मुंबई ( मित काव्य )
अंजली मुतालिक , कुडाळ जि सिंधुदुर्ग ( विवेकांजली) यांना जाहीर झाला आहे.

पुरस्कार प्रदान कार्यक्रम ऑनलाईन दिनांक ११ जुलै २०२३ ला , मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृतिदिनी कोकण नाउ चॅनेलवर करण्यात येईल. साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील व डॉ संजीव लिंगवत, जनसेवा प्रतिष्ठान , वेंगुर्ला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.

यावेळी मधुसूदन नानिवडेकर यांच्या कन्या अपूर्वा नानिवडेकर तसेच डॉ सतीश पवार, कणकवली उपस्थित असतील अशी माहिती स्नेहलता राणे ( लता सरंगले)
अध्यक्ष – सिंधुवैभव साहित्य समूह, कणकवली यांनी दिली आहे.

कणकवली ब्युरो न्यूज

error: Content is protected !!