आचरा बंदर रोडवर आंब्याचा वृक्ष कोसळला महिलेच्या अंगावर

सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या तत्परतेने महिला मिळाले जीवदान

गंभिर जखमी महिलेला कुडाळ येथे हलवले

आचरा –अर्जुन बापर्डेकर
मुसळधार पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले असून बुधवारी सायंकाळी आचरा बंदर रोडवर बागेश्री वहाळ येथे आंब्याचे झाड विद्यूतताराऔसह महिलेच्या अंगावर पडण्याची घटना घडली. झाड पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हटकर यांना महिलेच्या विव्हळण्याचा आवाज आला .तातडीने विद्यूत मंडळाला खबर देत उपस्थितांच्या मदतीने महिलेला बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

गेले दोन दिवस आचरा परिसरात तुफानी पाऊस कोसळत आहे.पारवाडी, कालावल खाडींना पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहे. आचरा भंडारवाडी येथील महिलेच्या आचरा बंदर रस्त्यावरून जाताना बागेश्री वहाळ येथे अंगावर आंब्याचे झाड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली असून तिच्यावर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी कुडाळ येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

आचरा भंडारवाडी येथील सुनंदा संजय परब या सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांकडे जात असताना मारुती मंदिरनजीक असलेले आंब्याचे झाड तिच्यावर कोसळले. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी पोलीस कर्मचारी अक्षय धेंडे, रणजित पांगे, मंदार बिनसाळे यांच्या सहाय्याने महिलेला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. माहिती मिळताच
स्थानिक ग्रामस्थ डॉ. राजेश भोसले, जेरोण फर्नांडीस मंदार सरजोशी, बाबल्या भिसळे, मदतीला सरसावले होते. झाडं मोठे असल्याने आणि विजेच्या तरा हीत्यात असल्याने यात महीलेला बाहेर काढण्यात अडचनी येत होत्या झाडे कट करण्याचा कटर आणून फांद्या कट करत अथक प्रयत्नाने महिलेला बाहेर कडण्यात यास आले. जखमी महिलेला बाबू परुळेकर यांनी गाडी मध्ये घालून आरोग्य केंद्रात हलवले परब यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले. मुजफ्फर मुजावर, जयप्रकाश परुळेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, चिराग आचरेकर, विक्रांत आचरेकर, जितेंद्र जुवेकर यांनी झाड हटविण्यास मदतकार्य केले.

आंब्याचा मोठा रुक्ष कोसळताना वीज वाहिण्याही तुटून पडल्या होत्या त्याच कोसळलेल्या झाडाखाली महिलाही अडकून पडली होती वीज प्रवाह बंद करण्यासाठी ग्रामस्थ वीज वितरण अधिकारी आणि कर्मचारी यांना मोबाईल द्वारे संपर्क करत होते मात्र वीज अधिकारी यांचे फोन बंद येत होतें शेवटी मुझफ्फर मुजावर यांनी कार्यालयाकडे धाव घेत घडलेली घटना सांगत वीज पुरवठा बंद करण्यास सांगितले. या साऱ्या प्रकारामुळे वीजवितरण अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे

वीज पुरवठा खंडित

दरम्यान, झाड कोसळल्याने वीज वाहिन्या तुटून पडल्या. त्यामुळे आचरे गावात सायंकाळी उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. युद्धपातळीवर वीज वितरणचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत होते. आचरा बाजारपेठ ते आचरा बंदर या मुख्य रस्त्यावर हे झाड कोसळल्याने तीन तास वाहतूक बंद होती. मिराशीवाडीमार्गे वाहने वळविण्यासाठी पोलिस कर्मचारी नेमण्यात आले होते. रात्री उशिरा जेसीबीच्या साहाय्याने झाड हटविण्यात आले.

error: Content is protected !!