डॉ. रेड्डी खून प्रकरणातील तीन संशयीतांना कणकवलीत आणले

अजून एक संशयित बेंगळूर येथे पोलिसांच्या ताब्यात

सिंधुदुर्ग पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती उघड करण्यास नकार

कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे वार करून खून केलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटल्यावर बेंगळुर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने हा यशस्वीरित्या तपास केला. या तपासा दरम्यान तीन संशयित आरोपींना ताब्यात घेत आज पहाटे कणकवलीत आणण्यात आले. खुनाच्या कटातील चौथ्या संशयिताला ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांचे दुसरे पथक बेंगळुरहून कणकवलीच्या दिशेने निघाले असून, ते आज बुधवारी सायंकाळपर्यंत कणकवलीत दाखल होण्याची शक्यता आहे. सुभाष सुब्रायप्पा एस (३२, रा. अलवत्ता तिमसंग्रा, श्रीनावस पुरम, जि. कोलार, कर्नाटक), नारायण स्वामी मूर्ती (३६, रा. अलवत्ता तिमसंग्रा, श्रीनावस पुरम, जि. कोलार, कर्नाटक), मधुसूदन सिद्दय्या तोकला (५२, रा. बेंगळुर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. ह्या गुन्ह्यातील अनेक महत्त्वाच्या बाबी या तपासात समोर येण्याची शक्यता असून पोलीस या प्रकरणाचा गतिमान तपास करत आहेत.

error: Content is protected !!