कणकवलीत तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

कणकवली नगरपंचायतीच्या वतीने कलमठ टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या बिजलीनगर, सोनगेवाडी, किनई, मारुती आळी, गांगोवाडी, आचरा रोड व हायवे या भागातील पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे. त्यामुळे तीचे दुरुस्तीचे काम 30 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात येणार असल्याने 30 ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत कलमठ टाकीवरुन होणारा पाणीपुरवठा बंद रहिल याची नागरिकांनी व नळ कनेक्शन धारकांनी नोंद घेऊन नगरपंचायतीस सहकार्य करावे. असे आवाहन नगरपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी





