वारकरी भजन स्पर्धेचे विशाल परब यांच्या हस्ते कुडाळमध्ये उदघाटन

विशाल परब यांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन
मंडळाच्या वतीने विशाल परब यांचा सन्मान
हा.भ.प. इंदुरीकर महाराज ऑक्टोबरमध्ये कुडाळ
विशाल परब यांची टाळ्यांच्या गजरात घोषणा
निलेश जोशी । कुडाळ : आषाढी एकादशी बरोबरच आज मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण देखील आहे. हा अत्यंत चांगला योग आहे. आणि अशा चांगल्या दिवशी मला एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं हे मी माझं भाग्य समजतो, असं प्रतिपादन विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक विशाल परब यांनी व्यक्त केलं. कुडाळ येथील मारुती मंदिरात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहाला विशाल परब यांनी भेट देऊन दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होते यावेळी. विशाल सेवा फाउंडेशन पुरस्कृत वारकरी भजन स्पर्धेचं उदघाटन विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आलं.

कुडाळच्या नगर मारुती मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताह सुरु आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशाल परब यांनी मंदिराला भेट देऊन विठोरखुमाईचं दर्शन घेतलं. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांच शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आलं. त्यांना श्रींचा प्रसाद देखील देण्यात आला.

नगर मारुती ब्राहमण मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येतात. विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वारकरी भजन स्पर्धेचं उदघाटन विशाल परब यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना विशाल परब यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. सातत्यानं हा हरिनाम सप्ताह उस्तव विविध कार्यक्रमांनी साजरा होत असल्याबद्दल त्यांनी मंडळाला शाबासकी दिली. या मंडळामुळे आपला श्रीनगरच्या आजचा दौरा रद्द करून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचं त्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितलं. आषाढी एकदाही आणि बकरी ईद हे सण आज आहेत त्यामुळे आज एक चांगलं योग असल्याचं श्री. परब म्हणाले.
९ ऑक्टोबर रोजी हा.भ.प. इंदुरीकर महाराज कुडाळात
विशाल सेवा फौंडेशनच्या माध्यमातून शिवगर्जना नाटक कुडाळ मध्ये झालं त्याला कुडाळ वासियांनी फार चांगला प्रतिसाद दिला. आता ९ ऑक्टोबर रोजी हा.भ.प. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन कुडाळमध्ये होणार असल्याचं विशाल परब यांनी जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी श्री मारुती मंदिर देवस्थान अध्यक्ष मंदार शिरसाट, तसेच कौसर खान, बख्तावर मुजावर, मंदार परुळेकर, हरेश घुर्ये, सूर्यकांत शिरसाट, शामा तेली, अजय शिरसाट, नितीन शिरसाट, जीवन बांदेकर, तसेच कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्य सागर तेली, अभय शिरसाट, श्रीराम शिरसाट, सुनील बांदेकर, राजेश महाडेश्वर, संदेश पडते, चेतन पडते, ऋषिकेश शिरसाट, बाबी बांदेकर, सुमेत साळवी, भूषण मठकर, दीपक भोगटे, नितीश महाडेश्वर, चिन्मय बांदेकर, दिनार पडते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केलं.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.