कुडाळ तालुका राष्ट्रवादीच्या वतीने वृणाल मुल्ला यांचे स्वागत

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक वृणाल मुल्ला यांची आज कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली,यावेळी कुडाळ तालुक्यातील विविध सामाजिक विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली,तसेच नेहमी चांगल्या विषयांना व सकारात्मक बाबींना राष्ट्रवादी काँग्रेस कडून कुडाळ पोलीस स्टेशनला पूर्वी प्रमाणेच यापुढेही सहकार्य राहील,से सांगण्यात आले.
यावेळी प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर भाई शेख, प्रांतीक सदस्य आत्माराम ओटवणेकर,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष साबा पाटकर, तालुका सहसचिव अनिल कानडे, आनंद आकेरकर, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रातिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.