दोडामार्ग हायस्कूलची वेदिका नाईक गुण पडताळणीनंतर तालुक्यात प्रथम

उत्तरपत्रिका फेरतपासणीत इंग्रजीमध्ये १० तर विज्ञान विषयात एका गुणाची वाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत फेरगुण तपासणीत दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॅलेज, दोडामार्गची विद्यार्थिनी वेदिका कृष्णा नाईक ४८२ गुण (९६.४० टक्के) मिळवून तालुक्यात प्रथम आली. तिला फेर तपासणीनंतर इंग्लिश विषयात तब्बल १० गुण व विज्ञान विषयात १ गुण अधिक मिळाला.तिच्या या यशाबद्दल संस्थाचालक विकास सावंत, खजिनदार सी. एल.नाईक , सचिव व्ही. बी. नाईक, मुख्याध्यापक शैलेश नाईक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.

प्रतिनिधी l दोडामार्ग

error: Content is protected !!