‘तरुण पिढी हीच राष्ट्राची खरी शक्ती’- मा. श्री. विश्वनाथ रावराणे

वैभववाडी

          महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शाहू महाराज यांची संयुक्त जयंती आज दिनांक २६ जून २०२३ रोजी महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली.
     या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विश्वनाथ रामचंद्र रावराणे यांनी विद्यार्थ्यांना युवाशक्ती हीच खरी देशाची संपत्ती आहे. युवकांनी राष्ट्रपुरुषांचे विचार व तत्वप्रणाली आचरणात आणली पाहिजे, जयंती साजरी करून न थांबता आपल्या महापुरुषांचे विचार अंगीकारले पाहिजेत, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. महाराणा प्रतापसिंह हे एक अपराजित असे पराक्रमी राजा होते, तर छत्रपती शाहू महाराज हे सर्व बहुजनांचे उद्धारक होते असेही त्यांनी प्रतिपादन केले. शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. सदानंद रावराणे यांनी  महापुरुषांची विचारधारा व शौर्यगाथा हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा प्रेरणास्त्रोत आहे, यातून विद्यार्थ्यांनी स्वतःला विकसित करून देश कार्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन केले. स्थानिक समिती अध्यक्ष श्री. सज्जन काका रावराणे यांनीही या जयंतीप्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एस. काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकामधून या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच करिअर कट्टामध्ये सर्व विध्यार्थ्यानी ३६५ रु. भरून नोंदणी करावी व त्यातील सर्व योजनांचा लाभ घ्यावा तसेच २६ जून २०२३ पासून सुरु होत असलेल्या तलाठी भरती पूर्व प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त पात्र विध्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन केले .गेल्या पोलीस भरती मध्ये निवड झालेल्या ५ विध्यार्थ्यापासून सर्व विध्यार्थानी प्रेरणा घ्यावी व भविष्यात होणाऱ्या विविध भरत्यामध्ये आपल्या विधार्थ्यानी सहभागी होऊन यशस्वी करिअर घडवावे असे सांगितले. प्रमुख वक्ते डॉ. आर. एम. गुलदे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या युद्धनीतीचा आढावा घेतला तर डॉ. विजय पैठणे यांनी छत्रपती शाहू महाराज हे केवळ बोलके राजे नसून ते कर्तव्यदक्ष व कर्ते राजे होते, असे विद्यार्थ्यांना सांगितले. महाविद्यालयातील कुमारी पूजा साखरपेकर, तुषार पार्टे, कुमारी श्वेता सावंत यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या तर कुमार प्रथमेश साळुंखे व सानिका पांचाळ यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवन कार्यावर आपली मनोगते व्यक्त केली.
error: Content is protected !!