कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी समाजभुषण संदीप लहु कदम यांची निवड

कणकवली : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेची सभा राज्याचे अध्यक्ष सन्माननीय कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद या ठिकाणी झाली . सदर सभेत शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .सदर वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाजभुषण सम्मा .संदीप लहू कदम यांची महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली . संदीप कदम यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणुन पंधरा वर्षे काम केले आहे . सद्दा ते कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहे .नुकताच त्यांनी माध्यमिक पतपेढी निवडणुकीत संचालक म्हणून दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे .त्यांच्या शैक्षणिक ,सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्माननीय कृष्णा इंगळे साहेब व कास्ट्राईब शिक्षक राज्य कार्यकारणी सदस्यांनी एकमताने त्यांची राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे . कास्ट्राईब शिक्षक संघटना राज्यस्तरीय उपाध्यक्ष नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.





