समृद्धी प्रतिष्ठानकडून साळगावात विद्यार्थ्यांना वह्या वाटप

साळगाव जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ च्या सर्व विद्यार्थ्यांना (ता.कुडाळ) तेथील सभागृहात समृद्धी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी वैशाली खानोलकर, समृद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ खानोलकर, सचिव प्रसाद परुळेकर ,कोषाधक्ष अमोल साळगावकर, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद साळगावकर, महिला समिती पदाधिकारी प्रतीक्षा परुळेकर, सुप्रिया साळगावकर, स्नेहलता साळगावकर, सिद्धी जोशी, रेश्मा पेडणेकर, रेवा साळगावकर ,रोशनी मठकर,अक्षय साळगावकर, प्रथमेश परुळेकर ,प्रणव परुळेकर लाभेश परुळेकर, रोशन पेडणेकर, राशी परुळेकर आदी उपस्थित होते.
‘गरजू,आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या अडचणी पाहून त्यांना मदत करण्याचा समृद्धी प्रतिष्ठान मनापासून प्रयत्न करीत आहेत.गरजवंताच्या शिक्षणात बाधा येऊ नये, म्हणून आपल्या परीने समृद्धी प्रतिष्ठान मदत करीत असते. ते गेल्या वर्षांपासून काम करीत आहेत.तो वसा इथून पुढेही चालू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.
सामाजिक उपक्रमात जमेल तसा सहभाग घेण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून समृद्धी प्रतिष्ठान काम करते.
“समाजातील अनेक विद्यार्थी शैक्षणिक साहित्याच्या प्रतीक्षेत असून, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्याची समृद्धी प्रतिष्ठानची प्रबळ इच्छा आहे. शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट सुखद होण्यास फायदेशीर ठरणार आहे.”असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ खानोलकर म्हणाले. प्राची परूळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची परुळेकर यांनी केले.राजन वालावलकर आणि विधी तुळसकर यांच्या विशेष सहकार्यातून हा कार्येक्रम यशस्वी झाला.

प्रतिनिधी l दोडामार्ग

error: Content is protected !!