विरोधकांनी रिकामे खोके घेऊन आंदोलने करावी मात्र भरलेले खोके मातोश्रीवर जातात

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याची टीका

शून्यशिक्षकी शाळेत डिएड बीएड धारकांची तात्पुरती नेमणूक करण्याच्या सूचना

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

सावंतवाडी

राज्यातील शून्य शिक्षक ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी स्थानिक डी एड, बी एड धारकांची मेरिटवर तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करावी किंवा माजी शिक्षकांना नेमणुक द्यावी,यासाठी येणाऱ्या खर्च व निधीतून खर्च करावा अशी सुचना राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. जिल्ह्यातील विरोधकांनी रिकामे खोके घेऊन आंदोलने करावी मात्र भरलेले खोके मातोश्रीवर जातात हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावे असा टोला हे त्यांनी आज लगावला.मंत्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली ते बोलत होते ते म्हणाले. यावेळी त्यांनी सावंतवाडी येतील अर्बन बँकेला उर्जेवर दहा वाजता आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे त्यामुळे बँकेच्या खातेदारांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये तसेच सावंतवाडी येथील अर्बन बँक हे काय बुडीत गेलीं नाही तभाग भाडवल मुळे ही समस्या निर्माण झाली आहे.यामुळे खातेदारांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. अशी माहिती यावेळी त्यांनी दिली यावेळी या पत्रकार परिषद यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, संजय आंग्रे ,तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!