सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न मार्गी लागणार

शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी मल्टीस्पेशालिटीचा प्रश्नही सुटण्याच्या मार्गावर

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-गेळेला भेडसावणारा कबुलायतदार प्रश्न आता सुटल्यात जमा आहे. त्या प्रश्नावर असलेला “स्टे” अखेर उठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. यावेळी त्यानी विरोधकांवर जोरदार टीका केली. राज्यात सर्व जिल्ह्यात शालेय पुस्तक पाठवली आहेत माञ ज्या ठिकाणी शाळेत पुस्तक पोहचली नाहित त्याला त्या ठिकाणचे अधिकारी जबाबदार असणार आहेत.

error: Content is protected !!