कनेडी येथे शिवसेनेच्या वतीने कामगार सभासद नोंदणी अभियान

जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ
शिवसेना (उद्धव ठाकरे गटाच्या) वतीने हरकुळ बुद्रुक नाटक, सांगवे- नाटळ विभागाच्या वतीने भव्य कामगार सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ आज शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते झाला पहील्याच दिवशी १४४ कामगार सभासदाची नोंदणी झाली.
कनेडी बाजारपेठेतील शिवसेना कार्यालयांमध्ये ही नोंदणी सुरू करण्यात आली आहे. दर रविवारी दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या सभासद नोंदणीचे काम येथे केले जाणार आहे. आजच्या उदघाटनास भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, शिवसेना कार्यकर्ते गुरुप्रसाद पेंढुरकर, गणेश शिवडावकर, राजू पाटील आदी उपस्थित होते. कामगार सभासद नोंदणी अंतर्गत शैक्षणिक सहाय्य योजनेचा फायदा ग्रामीण भागातील कामगारांच्या मुलांना मिळावा असा या मागील उद्देश आहे. या योजनेअंतर्गत विविध आरोग्य योजनांचा लाभ सभासदांना मिळणार आहे. आर्थिक सहाय्य योजनेचाही लाभ मिळणार आहे. सामाजिक सुरक्षितता व अन्य योजनांचा लाभ या सभासदांना होणार आहे. आजपासून सुरू झालेल्या या सभासद नोंदणी अभियाना मध्ये कामगारांना आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, एक फोटो, वारसाचे आधार कार्ड आवश्यक आहे. या अभियाना अंतर्गत पहिल्या टप्प्यांमध्ये १४४ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. दशक्रोशी मध्ये जे कामगार नोंदणीकृत नाहीत. अशा सर्व कामगारांची तात्काळ नोंदणी करून दिली जाणार आहे. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रम येथे राबविले जातील अशी माहिती राजू पाटील यांनी दिली आहे.
कणकवली प्रतिनिधी





