तोंडवळी खालची शाळा शनिवारी मुलांंवीना

कायमस्वरूपी शिक्षक मिळेपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याच्या निर्णयावर पालक ठाम

आचरा–अर्जुन बापर्डेकर
प्रशासनाकडून आवशयक शिक्षक मिळत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याच्या निर्णयावर
: जि. प. शाळा तोंडवळी खालची शाळेच्या पालक ठाम राहिल्याने शनिवारी शाळामुलांविना सुरु झाली
: जि. प. शाळा तोंडवळी खालची
येथील शाळेत शिक्षक पदे रिक्त आहेत. तरी दोन कायमस्वरूपी शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी तोंडवळी खालची येथील ग्रामस्थांनी मालवण पंचायत समिती शिक्षण विभागवर शुक्रवारी धडक देत. गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्यासमोर आक्रमक भूमिका मांडली होती.. सातत्याने मागणी करूनही शिक्षक मिळत नाहीत. त्यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. शिक्षक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. अन्याय आमच्या वरच का❓

जोपर्यंत शाळेत शिक्षक नियुक्त केले जात नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. अशी भूमिका तोंडावळी खालची ग्रामस्थ पालकांनी घेतली होती.

दरम्यान, गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी ग्रामस्थांना तात्पुरत्या स्वरूपात सोमवारी एक शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु जोपर्यंत दोन कायमस्वरूपी शिक्षक शाळेला उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत मुले शाळेत पाठवणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.अशी माहिती पालक नंदकुमार कोचरेकर यांनी दिली. यामुळे प्रशासनाकडून कायमस्वरूपी शिक्षक मिळत नसल्याच्या कारणास्तव शनिवारी तोंडवळी खालची शाळेच्या पालकांनी मुलांना शाळेत न पाठविल्याने शाळा मुलांविनाच सुरु असल्याचे चित्र दिसून आले.

error: Content is protected !!