रस्ता वाहतुकी सुरळीत करण्यासाठी कार्यकारी अभियंता उतरले स्वतः रस्त्यावर

देवगड निपाणी रोडवरची घटना
पाऊस व वादळी वाऱ्यामुळे देवगड निपाणी या रस्त्यावर पडलेली फांदी स्वतः भर पावसात गाडीतुन उतरून हटवून रस्ता वाहतुकीची सुरळीत केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची प्रशासनातील ही कामाची स्टाईल चर्चेचा विषय बनली आहे. आज अजयकुमार सर्वगोड, कार्यकारी अभियंता व श्री. बासुतकर, उप विभागीय अभियंता, श्री. नवपुते कनिष्ठ अभियंता यांचा पावसात पाण्याचा निचरा कसा होतो हा पाहणी दौरा चालू होता. हडपिड स्वामी समर्थ मठा कडील वळणावर मुसळदार पावसाने एका झाडाची फांदी तुटून रस्तावर पडली. ही बाब कार्यकारी अभियंता यांच्या लक्षात येताच गाडी थांबून फांदी बाजूला करून रस्ता अपघात होऊ नये म्हणुन तात्काळ कार्यवाही केली. श्री. बासुतकर, उप विभागीय अभियंता, श्री. शैलेश कांबळे, श्री. अविनाश लाड वाहन चालक व श्री. रवींद्र गोरुले यांच्या मदतीने रस्ता वाहतुकीस सुरळीत केला. अजयकुमार सर्वगोड यांनी केलेल्या या प्रशासनातील अशा कामाची चर्चा सुरू आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





