चालकाचा ताबा सुटल्याने तिलारी घाटात टँकरचा अपघात

प्रतिनिधी l दोडामार्ग
चालकाचा ताबा सुटल्याने तिलारी घाटात गुरुवारी सायंकाळी टँकरचा अपघात झाला . टँकरचा दर्शनी भाग समोरच्या कठड्याला आदळून दर्शनी भागाचे नुकसान झाले. नागमोडी वळणे आणि तीव्र उतार याकडे काही चालक दुर्लक्ष करतात. काहीवेळा स्टिअरिंग लॉक होऊन पटकन टर्न घेता येत नाही त्यामुळे वाहन वळण्याऐवजी सरळ पुढे जाऊन कठड्याला आदळते आणि अपघात होतात.
तिलारी घाटात गुरुवारी झालेल्या अपघातात चालकाने एका नागमोडी वळणावर (जयकर पॉइंट नव्हे)उशिरा टर्न घेतल्याने टँकर पुढे गेला आणि चालकाचा त्यावरील ताबा सुटून अपघात झाला. अपघात झाला ते वळण बऱ्यापैकी रुंद आहे. वळणावर सहज दोन मोठ्या गाड्या धावू शकतात. त्यासाठी योग्य ती खबरदारी चालकांनी घेऊन वाहने हाकणे गरजेचे आहे. अपघातग्रस्त टँकरच्या चालकाने थोडा आधी टर्न घेतला असता तर टँकर अगदी सहज वळून मार्गस्थ झाला असता असे घटनास्थळावरील परिस्थिती पाहता लक्षात येते. अपघात टाळण्यासाठी चालकांनी सतत सजग राहण्याची गरज आहे. तसेच घाट उतरण्याआधी स्टिअरिंग, ब्रेक, क्लच, रात्रीच्या वेळी लाइट्स, पावसाळयात वायपर्स आदींची तपासणी करणे आवश्यक आहे.