प.पू भालचंद्र महाराज नागरी सह.पतसंस्था खारेपाटण च्या वतीने सेवानिवृत्त सुरक्षारक्षक यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण गावातील प पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेचे कर्मचारी तथा सुरक्षा रक्षक श्री भास्कर धनाजी तोरसकर हे संस्थेच्या सेवेतून नुकतेच वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन श्री नासीरभाई काझी यांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ,पुषपगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार संस्थेच्या खारेपाटण येथील प्रधान कार्यालयात करण्यात आला.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री राजेंद्र ब्रम्हदंडे, संचालिका श्रद्धा देसाई,सौ मनस्वी कोळसुलकर,संचालक श्री परवेज पटेल,राजेंद्र वरूणकर,श्री कुडतरकर तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शुभम मोरे, शाखा व्यवस्थापक श्री सत्यवान खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे कर्मचारी श्री भास्कर धनाजी तोरसकर हे गेली १० वर्षे सुरक्षा रक्षक म्हणून प्रामाणिकपणे काम करत होते. नुकतेच ते सेवेतून निवृत्त झाले.खारेपाटण येथील प.पू. भालचंद्र महाराज नागरी सह.पतसंस्थेतेच्या वतीने त्यांचा योग्य तो सन्मान करून त्यांना सेवानिवृत्त सेवादानाची रक्कम त्यांच्यकडे सुपूर्द करण्यात आली. तर त्यांच्या पत्नीचा देखील संस्थेच्या संचालिका सौ श्रद्धा देसाई यांच्या शुभहस्ते साडी चोळी व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.तसेच संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने देखील श्री भास्कर धनाजी तोरसकर यांचा सत्कार करण्यात आला.व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आला.
“कर्मचारी हा संस्थेचा कणा असून ग्राहक व संस्था चालक यांच्यामधील तो दुवा आहे.त्यामुळे कर्मचारी वर्गाने आपल्या सेवा काळात चांगले काम करून संस्थेला आर्थिक सक्षम करून मोठे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ” असे भावपूर्ण उदगार संस्थेचे चेअरमन श्री नासीर भाई काझी यांनी सत्कार कार्यक्रमात बोलताना काढले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व कर्मचारी व संस्थाचालक यांनी मेहनत घेतली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री शुभम मोरे यांनी मानले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!