खारेपाटण येथील श्री देव कालभैरव मंदिर ट्रस्ट यांच्या मार्फत खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना ४०,००० ₹ किमतीच्या १००० वह्यांचे वाटप

खारेपाटण येथील प्रसिद्ध असलेले ७२ खेड्याचे देवस्थान श्री देव कालभैरव – दुर्गादेवी. मंदिर ट्रस्ट खारेपाटणच्या वतीने सामाजिक उपक्रमा अंतर्गत खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील विद्यार्थ्यांना सुमारे ४०,०००/- रुपये किमतीच्या एकूण १००० वह्यांचे वाटप आज शाळेत ट्रस्ट चे अध्यक्ष श्री मधुकरशेठ गुरव यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्याना करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण चे ट्रस्टी श्री प्रवीण लोकरे, विजय देसाई,संकेत शेट्ये,सुधीर कुबल,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे,पत्रकार श्री रमेश जामसंडेकर,खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याद्द्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने पदवीधर शिक्षिका श्रीम. अर्चना तळगावकर यांनी पुषपगुच्छ देऊन स्वागत केले.
“खारेपाटण केंद्र शाळा ही राज्यातील मॉडेल स्कूल म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असून या शाळेतील उपक्रम समाजाशी निगडीत असतात.या शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रावणकर सर हे तन मन आणि धनाने शाळेसाठी काम करतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आणि म्हणून सामजिक जाणिवेतून आमच्या गावच्या श्री देव कालभैरव मंदिर ट्रस्टच्या वतीने या शाळेला मदत करताना व येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करताना आम्हाला अत्यानंद होत असल्याचे.भावपूर्ण उद्गगार श्री देव कालभैरव मंदिर ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांनी यावेळी व्यक्त केले. “
तर सामजिक कार्यकर्ते श्री विजय देसाई यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीम.रेखा लांघी,रुपाली पारकर,अलका मोरे,आरती जेजोंन, आदींनी परिश्रम घेतले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी केले. व शाळेला वह्या दिल्याबद्दल शाळेच्या वतीने ट्रस्टचे मनःपूर्वक आभार देखील व्यक्त केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण