माजी आमदार केशवराव राणे हे कोकणच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार

कुलगुरु डॉ. संजय भावे यांचे प्रतिपादन
कणकवली /मयुर ठाकूर
माजी आमदार केशवराव राणे यांनी कोकणातील शेती फलोद्यान जलसिंचन आणि शिक्षण अशा सर्व क्षेत्रातील विकासाचा ध्यास घेतला होता.
कोकणाच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार खऱ्या अर्थाने माजी आमदार केशवराव राणे ठरतात असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी व्यक्त केले.
माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन, शिक्षण महर्षी कै. केशवराव राणे यांच्या १३ व्या स्मृती दिनानिमित्त कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी कणकवली महाविद्यालयात भेट देऊन कै.केशवराव राणे यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी डॉ. भावे यांचा कणकवली महाविद्यालयाच्या वतीने चेअरमन डॉक्टर राजश्री साळुंखे यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ व सुरंगीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विशेष मानद अधिकारी डॉ. संदीप साळुंखे, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, कणकवली महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.