कणकवली नगरपंचायत च्या दोन कर्मचाऱ्यांना पदोन्नती

मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी आदेश देत केले अभिनंदन

कणकवली नगरपंचायत च्या आकृतीबंधामध्ये मंजूर असलेल्या पदसंख्येनुसार कणकवली नगरपंचायत च्या दोन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये नगरपंचायतचे लिपिक म्हणून गेली अनेक वर्षे कणकवली नगरपंचायत मध्ये कार्यरत असणारे किशोर धुमाळे यांना वरिष्ठ लिपिक पदी तर नगरपंचायती शिपाई असणारे प्रशांत राणे यांना लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी याबाबतचे आदेश श्री. धुमाळे व राणे यांना दिले आहेत. कणकवली नगरपंचायत मध्ये या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे सेवा केली असून त्यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. याप्रसंगी नगरपंचायत चे अभियंता सचिन नेरकर, विभव करंदीकर आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!