शाब्बास ! पाट हायस्कूलची कुमारी श्रुतिका मोर्ये पखवाज विशारद
निलेश जोशी । कुडाळ : पाट हायस्कूल मध्ये बारावीमध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी कु श्रुतिका आनंद मोर्ये हिने यावर्षी पखवाज विशारदची परीक्षा दिली होती. या परीक्षेत द्वितीय श्रेणीमध्ये तिने यश संपादन केलेले आहे. एक वेगळे क्षेत्र निवडून श्रुतिकाने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
पाट हायस्कूलमध्ये कै एकनाथजी ठाकूर कला अकादमी मार्फत विविध कला वर्ग सुरू असून यामधून पखवाज वादन, हार्मोनियम वादन, गायन, नृत्यकला, इत्यादी वर्ग चालतात. या विषयाचा दहावीच्या वाढीव गुणांचाही फायदा मुलांना होत आहे.
श्रुतिकाच्या या यशामध्ये तिचे पालक वादक आनंद मोर्ये पखवाज वादक यांचा मोठा सहभाग आहे. विद्यालयात तिचे मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, कलाशिक्षक संदीप साळस्कर, श्री कुबल सर यांच्यातर्फे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
पखवाज कलेमध्ये यश मिळवल्याने सर्व संस्था पदाधिकारी यांच्यातर्फेही खास कौतुक करण्यात आले. शिक्षण घेत असताना एखादी कला आत्मसात करावी हाच मुख्य उद्देश कै एकनाथजी ठाकूर कलाकादमीचा आहे. अशा यशानंतर आपल्या संस्थेचा हा उद्देश सफल होताना दिसत आहे. जास्तीत जास्त मुलांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन पर्यवेक्षक राजन हजनकर यांनी केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.