वागदे पोलीस पाटील सुनील कदम यांची विधी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती

सामाजिक कामात सुनील कदम सर्व स्तरावर असतात अग्रेसर
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस स्टेशन वैभववाडी येथे विधी स्वयंसेवक सुनिल सखाराम कदम रा. वागदे यांनी कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी, दुर्बल घटकांना विधी सहाय मिळविण्याकामी मदत करण्यासाठी, प्राधिकरणामार्फत पुरविण्यात येणा-या सेवांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी, पोलिस स्टेशन मधील लिगड एड क्लिनिकमध्ये हजर राहून दर आठवडयातील प्रत्येक सोमवारी सकाळी ठिक ११.०० ते ०५.००वा यावेळेत काम पहाणेसाठी विधी स्वंयसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुनील कदम यांचे अभिनंदन होत आहे. सुनील कदम हे वागदे व साकेडी येथे पोलीस पाटील म्हणून कार्यरत असून सामाजिक कामात नेहमीच त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
कणकवली प्रतिनिधी





