विम्बल्डन खेळाडू ऐश्वर्या जाधवला घोडावत फौंडेशनची स्पॉन्सरशिप

अतिग्रे – विम्बल्डन खेळाडू, कोल्हापूरची कन्या ऐश्वर्या जाधव १९ जून ते २४ जून व २६ जून ते १ जुलै दरम्यान थायलंड या देशात होणाऱ्या ‘ज्युनिअर टेनिस जे ६०’ या स्पर्धेसाठी जाणार आहे. यासाठी अध्यक्ष संजय घोडावत यांनी घोडावत फौंडेशनच्या माध्यमातून 75 हजार रुपयांची तिला स्पॉन्सरशिप दिली.
सध्या ऐश्वर्या,संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये १० वी च्या वर्गात शिकत आहे. टेनिस खेळामध्ये तिने जागतिक स्तरावर यश संपादन केले आहे. सध्या तिचा टेनिस खेळात जागतिक क्रमवारीत ८३७ वा क्रमांक आहे.
या प्रसंगी बोलताना श्री. संजय घोडावत म्हणाले, “ऐश्वर्यासारखे अनेक खेळाडू जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्वल करीत आहेत. कोल्हापूरच्या खेळाडूंनी ऑलिंपिक खेळामध्ये पदके प्राप्त करावीत हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे ऐश्वर्या असेल किंवा तिच्यासारख्या इतर अनेक खेळाडूंना जागतिक स्पर्धेसाठी घोडावत फाउंडेशन नेहमीच मदत करेल.ऐश्वर्याने ऑलिंपिक खेळामध्ये पदके प्राप्त करावी यासाठी तिला नेहमीच प्रोत्साहन व मदत करेन. या स्पर्धेसाठी ऐश्वर्याला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
ऐश्वर्याच्या शालेय शिक्षणाचा सर्व खर्च घोडावत फौंडेशनच्या माध्यमातून होतो.तिच्या खेळासाठी उपयुक्त अशा सर्व सुविधाही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.
या स्पर्धेसाठी ऐश्वर्याला मिळालेल्या स्पॉन्सरशिपबद्द्ल तिचे वडील दयानंद जाधव यांनी संजय घोडावत यांचे आभार मानले. या प्रसंगी विश्वस्त विनायक भोसले व संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती उपस्थित होत्या.





