आदर्श विद्यालय करंजेची १००% निकालाची परंपरा कायम

तांबे एज्युकेशन सोसायटी संचलित करंजे – नागवे -साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालयाचा दहावी मार्च – २० २३ चा निकाल १०० % लागला असून प्रशालेने सातत्याने १५ वर्षाची १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
परीक्षेस एकूण ३३ विद्यार्थी बसले होते. यामध्ये प्रथम क्रमांक = कु . सानिका केशव आर्डेकर = ९४.८० % , व्दितीय क्रमांक कु. दिव्या सिताराम कोरगावकर = ८९.०० % , तृतीय क्रमांक = कु . माधुरी नारायण मेस्त्री = ८७. ८० % यामध्ये विशेष प्राविण्य = १८ , प्रथम श्रेणी = ०९ , व्दितीय श्रेणी = ०६ विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत .
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी मा .प्रिं आर .एल . तांबे सर , संस्थेचे विश्वस्त मा .अभयजी तांबे सर , सर्व विश्वस्त , प्रशाला मुख्याध्यापक श्री .एस . डी चोडणकर , शालेय समिती , पालक शिक्षक संघ , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , पालक वर्ग यांच्याकडून अभिनंदन होत आहे .

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!