न्यू इग्लिश स्कूल आचराचे दहावी परीक्षेत १०० टक्के यश

आचरा–अर्जुन बापर्डेकर
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कुल आचरा हायस्कूल ने दहावी परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत सर्व च्या सर्व ८८विद्यार्थी पास होत १००टक्के निकाल लागला.
नव्वद टक्के च्या वर सात विद्यार्थ्यांनी यश संपादन करत या यशात मानाचा तुरा खोवला.
या हायस्कूल मधून९७.२०टक्के गुण मिळवून वेदांत संतोष गोसावी याने प्रथम क्रमांक मिळविला.प्रीतम रविंद्र कोळगेहिने ९६.४०टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अदिती जितेंद्र गरड९४.४० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
आर्या आचरेकर ९३.९०टक्के, तेजस्वी पाडावे ९३.२०टक्के,स्नेहा मेस्त्री ९०.८०टक्के,चंचल गोसावी ९०.४०टक्के गुण मिळवित उल्लेखनीय यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी,सचिव अशोक पाडावे, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलिमा सावंत ,समिती सदस्य बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे, संजय पाटील, शंकर मिराशी, तसेच मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक घुटूकडेसर यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.





