आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा एस,एस,सी. चा निकाल 100%.

कणकवली/मयुर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा एस,एस,सी. चा निकाल शंभर टक्के लागला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला.या प्रमाणपत्र परीक्षेत एकूण 67 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तर 90%च्या वर दहा विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 39 विद्यार्थी उत्तीर्ण, प्रथम श्रेणीत अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पहिले दहा विद्यार्थी खालील प्रमाणे.
1)कु.सृष्टी संतोष जोगळे 96.40%
2) कु पवन सुनील पवार 94%
3) कु अथर्व गजानन गावकर ९३.८० टक्के
4)कु मेहविश अमनाम शेख ९३.२०%
5) कु पुनम संतोष अरकराव 91.80%
6)कु श्रुंगी श्रीधर मारे 91.80%
7)कु रिया दयानंद बांदेकर 91.40%
8)कु अंजली वासुदेव मयेकर ९१.४० टक्के
9)कु दुर्वाक मनोज तहसीलदार 90.80%
तर
10)कु प्रणय सुहास नागवी 90.20%.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विद्यालय टायशेटे,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत,कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल,सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे, सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर,खजिनदार शितल सावंत, सल्लागार श्री डी पी तानवडे,शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेखर देसाई, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.