तुषार पवार चा आज कणकवलीत सत्कार

छत्रपती शिवाजी महाराज मंडळातर्फे आयोजन
यु.पी.एस.सी.परीक्षेत सुयश;संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त केलेल्या तुषार दीपक पवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्याने संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त केली आहे. याबद्दल तुषारचा कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज उत्कर्ष मंडळातर्फे आज शुक्रवार दोन जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता सत्कार करण्यात येणार आहे कणकवली शिवाजीनगर येथील शिव पुतळा चौक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे उमेश वाळके यांनी दिली आहे
तुषार हा सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत या यशापर्यंत पोचला असून त्याचे वडील दीपक पवार हे कणकवली येथील खरेदी विक्री संघात काम करतात तर आई घरी शिवणकाम करते.प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्याने ही मजल गाठली आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचा हा कौतुक सोहळा आयोजनेत आला आहे.
कणकवली चे तहसीलदार पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उमेश वाळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज उत्कर्ष मंडळाच्या वतीने केले आहे.
कणकवली ब्युरो न्यूज