लाडवाडी-कोळंबच्या नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

श्री महादेवी आकारसेवा मंडळ लाडवाडी-कोळंबचे रौप्य महोत्सवी वर्ष

विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : श्री महादेवी आकारसेवा मंडळ लाडवाडी-कोळंब, मालवणच्या रौप्य महोत्सवी वर्ष २०२३ अंतर्गत आयोजित खुल्या एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पिगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली.   रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रक्तदान व आरोग्य शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते. अष्टपैलू कलानिकेत मालवण यांचा सदाबहार कार्यक्रम झाला.
तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा व महाआरती दुग्धाभिषेक महाप्रसाद, देवीची ओटी भरणे व हळदीकुंकू – भजन सम्राट श्री. भालचंद्र केळुसकर यांचे सुश्राव्य भजन सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कलाकुर ग्रुप मालवण निर्मित मराठमोळा नजराणा आदी भरगच्च कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला.
खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत दितीय समर्थ गवंडी, तृतीय पूर्वा मेस्त्री यांनी मिळविला. परीक्षण सागर सारंग, रोहित माने यांनी केले. विजेत्यांना अनुक्रमे रु पाच हजार, रु तीन हजार, रु दोन हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण प्रसंगी मंगेश लाड, शीतल लाड,  जयश्री लाड, प्रथमेश लाड उपस्थित होते. निवेदन मंगेश लाड यांनी केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!