मारहाण व धमकी प्रकरणी दया मेस्त्री याच्यावर गुन्हा दाखल

पत्नी व मुलांवर कोयता उगारून मारण्याची दिली धमकी
जेवणाच्या रागातून दयानंद मेस्त्री (50, वागदे) यांनी पत्नी व मुलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत दयानंद मेस्त्री याच्यावर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसात दयानंद मेस्त्री याच्या पत्नी शितल दयानंद मेस्त्री यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, सोमवारी रात्री दयानंद मेस्त्री यांनी जेवणाच्या कारणावरून फिर्यादी पत्नी व मुलांना शिवीगाळ करत धमकी देऊन तुम्हाला संपवून टाकतो असे म्हटले. व कोयता उगारला असे या फिर्यादीत त्यांच्या पत्नी शितल मेस्त्री यांनी म्हटले आहे. या नुसार भादवी कलम 323, 324, 504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कणकवली/ प्रतिनिधी