श्रेया समीर चांदरकरला राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार जाहीर

पंढरपूर येथे 26 ते 28 मे 2023 रोजी होणाऱ्या दुसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात कुमारी श्रेया समीर चांदरकर हिला अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
श्रेया चांदरकर ही वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असून, तिने विविध रंगीत धागांपासून बनवलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीची दखल सोशल मीडिया व विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तिने विविध माध्यमातून अनेक कलाकृती साकार केल्या व बक्षीसही मिळवली.
राज्यस्तरीय अक्षर संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या कलाकृतीची दखल घेतली. पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात अक्षर गौरव पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात येणार आहे….

error: Content is protected !!