प्रगत विद्यामंदिर रामगड प्रशालेत गोठणे सडेवाडी येथील सावंत कुटूंबीयांकडून इ.10वीच्या मुलांना क्रमिक पुस्तके व वह्यां प्रदान

मालवण : प्रगत विद्यामंदिर रामगड, ता. मालवण या प्रशालेत गोठणे सडेवाडी येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले श्री. महादेव सहदेव सावंत (स्टेट बँक ऑफ इंडिया मुबंई मधून सेवानिवृत्त अधिकारी ) व त्यांच्याच कुटूंबातील सदस्य श्री. राजेंद्र दत्ताराम सावंत (मंत्रालय महाराष्ट्र शासन, न्यायाधीश तथा सचिव मुंबई ) यांच्या कडून नुकताच इ. दहावीच्या हुशार परंतु गरीब पाच विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तकांचा संपूर्ण संच व वह्या वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
गेल्या काही वर्षांपासून या शिक्षण प्रेमी सावंत कुटूंबियाकडून मे महिन्यात आपल्या गावी मुलांना पुस्तके व वह्या वाटप करण्याचा कार्यक्रम नित्य नियमाने करतात. या वर्षी विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम 19 मे रोजी प्रशालेत संपन्न झाला.
या प्रसंगी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. वळंजू अं. म. यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.तसेच या क्रमिक पुस्तके व वह्या वाटप करण्याचा सावंत कुटूंबाचा उद्देश मुलांना व पालकांना सांगितला. उपस्थित मुलांना व पालकांना गरज असेल तर या पुढेही मदतीचा हात राहील असे प्रतिपादन सावंत कुटूंबानी केले. शिक्षकांनी मुलांचा प्रगतीसाठी सर्वतो प्रयत्न करावेत. आमची साथ नेहमीच असेल याची ग्वाही दिली. ज्या मुलांना व त्यांचा पालकांना ह्या पुस्तकांचा व वह्यांचा लाभ झाला त्यांनी सावंत कुटूंबाचे आभार मानले. तसेच संस्था संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सावंत कुटूंबाच्या दातृत्वाबद्दल ऋण व्यक्त केले.