विहिरीत पडला सात फुटी नागराज!

मालवण तालुक्यातील चिंदर लब्देवाडी सडा येथील सुमारे पस्तीस फूट खोल विहिरीत पडलेल्या सर्पास सुखरूप विहिरी बाहेर काढण्यास यश आले. येथील दीपेश लब्दे यांच्या शेत विहिरीत सर्प दिसून आल्या नंतर मसुरे येथील सर्पमित्र रमण पेडणेकर याना बोलावण्यात आले. रमण याने सतीश मसुरकर याना सोबतीला घेत सापाची रेस्क्यू मोहीम राबविली. प्रथम पाण्यात टोपली सोडून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तो प्रयत्न असफल झाल्यावर जाळे सोडून या सर्पाला बाहेर काढण्यात रमण यांना यश आले. सुमारे सात फूट लांबीच्या सर्पास रमण यांनी लगतच नैसर्गिक अधिवासात या सर्पास सोडले.

आचरा-प्रतिनिधी

error: Content is protected !!