कणकवलीतील 50 गरजू महिलांना गौरव गवाणकर यांच्याकडून मोफत साडी वाटप

कै. सुधा गवाणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राबवला उपक्रम
कणकवलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अपीशेठ गवाणकर यांच्या पत्नी कै. सुधा गवाणकर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांचा मुलगा व गवाणकर हार्डवेअर चे मालक गौरव गवाणकर यांच्या वतीने कणकवली शहरातील गरजू महिलांना मोफत साडी वाटप करण्यात आले. कणकवली शहरातील तब्बल 50 महिलांना गौरव गवाणकर यांच्या वतीने सुधा गवाणकर यांच्या स्मृतिप्रत्यर्थ साडीवाटप करून अपिशेठ गवाणकर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा गौरव गवाणकर व त्यांच्या कुटुंबीयांकडून जपण्यात आला. कणकवलीचे माजी नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी शहरातील महिलांना गौरव गवाणकर यांच्या वतीने मोफत साडी वाटप केले. या उपक्रमाबद्दल या महिलांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात आले.
दिगंबर वालावलकर /कणकवली