खासदार कुमार केतकर यांच्या निधीतून तरेळे बाजारपेठेतील विकास कामाचे भूमिपूजन

तरळे ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आले समाधान
काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख व जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तरळे सरपंच हनुमान तळेकर ,तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर ,जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर ,काँग्रेस तालुका सरचिटणीस महेश तेली , ग्रामपंचायत सदस्य सचिन पिसे ,ग्रामपंचायत सदस्या समृद्धी कल्याणकर ,कमलाकर तांबे, प्रदीप कुमार जाधव ,निलेश मालडंकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिकेत दहिबांवकर, पंढरीनाथ पांगम,संतोष तेली ,व्यापारी घटना अध्यक्ष स्वप्निल कल्याणकर ,योगेश मुद्राळे , सिद्धेश वरूनकर,दाजी कदम, बंड्या ढेकणे, राजेंद्र पिसे ,दादा नेवरेकर, अक्षय घाडीगावकर ,अहमद बोबडे ,भैया खटावकर आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख यांनी विकास कामात राजकारण नकरता विकास कामे करणार असे आश्वासन दिले. व अनेक वर्षांची तरळे बाजारपेठ ग्रामस्थांची मागणी पूर्ण केल्यामुळे प्रवीण वरूनकर यांच्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
कणकवली प्रतिनिधी





